मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय कोल्हापुरातील मराठा नेत्यांना तुर्तास मान्य नाही…

मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव एकजुटीने एकवटलेला होता. मनोज जरांगे पाटील  यांच्या नेतृत्वात मराठा समाज अंतरवाली सराटी येथून पायी नवी मुंबईत दाखल झाला. लाखोंच्या सख्येंने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले होता. मात्र त्याआधीच राज्य सरकारने मराठा बांधवांना गुडन्यूज दिली .

मनोज जरांगे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते, त्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सुपूर्द केला. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाचा जल्लोष सुरु असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात झालेला निर्णय कोल्हापुरातील मराठा समाजातील नेत्यांना मान्य नाही.

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी कोल्हापुरातील मराठा समाजातील नेत्यांची आहे. राज्य शासनाने मनोज जरांगे यांना दिलेली कागदपत्रे कोल्हापुरातील ज्येष्ठ विधी तज्ञांमार्फत तपासून घेणार असल्याचं मराठा नेत्यांनी म्हटलं आहे. 

राज्य शासनाने मराठा समाजासाठी दिलेला जीआर कोर्टाच्या पायरीवर टिकणारा आहे की नाही या संदर्भात उद्या मराठा समाजातील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकीनंतर मराठा समाजाच्या आंदोलनासाठी पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे.