झक्कास! तोंडाला पाणी सुटेल अशी पनीर ग्रेव्ही रेसिपी….

अलीकडच्या काळात प्रत्येकजन हा खाण्याचा शोकीन आहेच. चटकदार खमंग दररोज काही ना काही खाण्याची तल्लफ ही होतच असते. तर अशीच खमंग अशी पनीर ग्रेव्ही रेसिपी घरच्या घरी तयार कशी करायची हे आपण पाहू…..

प्रत्यक्षात लागणारा वेळ: १० मिनिटे

लागणारे जिन्नस: 

● पनीर २०० ग्राम
● दोन मध्यम कांदे
● एक छोटा टोमॅटो (ऑप्शनल)
● काजू ५-६
● मनुका २०-२५
● हिरव्या मिरच्या २
● हिरवी इलायची २
● जीरे पावडर पाव छोटा चमचा

गरम मसाला पावडर अर्धा छोटा चमचा
● मध्यम तेज पत्ता
● अर्धा इंच दालचिनी
● फोडणी साठी तेल
● बटर एक चमचा
● कसुरी मेथी
● मीठ
● पाणी

पाककृती: 

● कांदे दहा मिनिटं कच्चा वास जाईपर्यंत उकळून थंड होऊ द्यावे
● मिक्सर जारमधे उकडलेले कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, इलायची, काजू, मनुके, जीरे पावडर, गरम मसाला पावडर पेस्ट करून घ्यावी.
● कढईत तेल गरम करून तेजपत्ता,दालचिनी टाकून, वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
● मिक्सर जार विसळून तितकेच पाणी कढईत घालावे.
● एक उकळी आली कि पनीर चे तुकडे घालावेत.
● शेवटी कसुरी मेथी आणि बटर घालावे.

तयार झाली आपली पनीर ग्रेव्ही .