Tomato Pakoda Recipe: दुपारी जेवणात बनवा स्वादिष्ट टोमॅटो पकोडे, नोट करा रेसिपी

तुम्ही कांदा, बटाटा पकोडे खाल्ले आसणार.पण कधी टोमॅटो पकोड्याची चव चाखली आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला टोमॅटो पकोडे कसे बनवावे हे सांगणार आहोत.हे पकोडे बनवणे खुप सोपे असून चवदार आहे. घरातील सर्व सदस्यांना देखील आवडेल. चला तर मग जाणून घेऊया टोमॅटो पकोडे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

टोमॅटो भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

चार टोमॅटो
२ वाट्या बेसन पीठ
१ चमचा ओवा
१ चमचा हळद,
१ चमचा तिखट
तेल आणि चवीनुसार मीठ

टोमॅटो भजी बनवण्याची कृती

टोमॅटो भजी बनवण्यासाठी सर्वात आधी सुरुवातीला टोमॅटोच्या गोल आकारात पातळ चकत्या कराव्यात.

त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घेऊन, त्यात पाणी घालून भजीसाठी पीठ भिजवतो तसे पीठ भिजवावे.

पीठ जास्त पातळ असू नये.

आता त्यात ओवा, चवीनुसार मीठ, एक चमचा हळद, एक चमचा तिखट, ओवा घालून सगळे साहित्य मिक्स करून घ्यावे.

त्यानंतर टोमॅटोची एकेक चकती पिठात बुडवून कढईमध्ये गरम तेलात गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळावे.टोमॅटो भजी तुम्ही सॉसबरोबर सर्व्ह करू शकता.