इचलकरंजीच्या सुपुत्रांचा सत्कार..!

शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल इचलकरंजीतील राजू बुगड,गिरीष संजय नेर्लेकर,मंदार दिलीप पाटील यांचा सत्कार चौंडेश्वरी सहकारी सुत गिरणीचे चेअरमन श्री संजय दादा कांबळे व पोलीस निरीक्षक श्री राजू तासिलदारसो यांच्या हस्ते संपन्न झाला..

मनोगत व्यक्त करताना संजय दादा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना MPSC,UPSC व इतर शासकीय ,पोलीस ,बँक सेवेतील परीक्षा मार्गदर्शन केंद्र (अभ्यासिका) देवांग समाज रजि. इचलकरंजी वतीने सुरू करण्यात येणार असल्याबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांना कोणतेही अडचण आल्यास सहकार्य करण्याचे आश्वासित केले.
यावेळी संयोजक म्हाळसाकांत कवडे,सागर पोटे,निलेश आमणे,संजय जाधव,विजय मुसळे,प्रशांत सपाटे,अमोल डाके,गणेश फाटक,तसेच बहुसंख्येने महिलावर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुदर्शन युवक मंडळ पदाधिकारी व सदस्य यांनी केले .