मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाकडून झालेल्या बैठकीत तीन ठराव मंजूर केले. याच बैठकीत राज्यात 1 फेब्रुवारीपासून ओबीसी समाजाने आमदार, खासदार, तहसीलदार यांच्या घरासमोर आंदोलन करावे असेही ठरविण्यात आले.
तेव्हा आता 1 फेब्रुवारी रोजी राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिली.त्याचबरोबर याच दिवशी मराठवाड्यातून सुरुवात करत संपूर्ण राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा काढली जाणार आहे अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.