भावई उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा…

आष्टा नगरीचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरीदेवीचा (अंबाबाई) ‘भावई’ उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे अवाहन आष्ट्याचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी केले.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. भावई उत्सवाचे मालक थोरात सरकार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन भंडारे उपस्थित मागणी. उत्सवकाळात अडथळा आणून शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक यांनी दिली.
सध्या भावई उत्सवात युवकांच्या हुल्लडबाजीचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. उत्सवातील संपूर्ण कार्यक्रमांचे व्हिडीओ शुटींग करण्यात येणार आहे.उत्सवातील मानकरी व खेळगड्यांबरोबरच नागरिकांनीही युवकांच्या हुल्लडबाजीबद्दल तसेच उत्सवासाठी आलेल्या छोट्या व्यसाईकांना त्रास दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून याचा बंदोबस्त करण्याची व शहरातील चोरीच्या घटना, गर्दी मारामारी, गायी, बैल, डुकरे, कुत्री मोकाट आदींचा बंदोवस्त करणे, उत्सव मार्गावरील उघड्या गटारी झाकून घेणे, वाहतुकीचे नियंत्रण करणे, महिला व मुलींच्या छेडछाडीचा बंदोबस्त करणे, गर्दीच्या ठिकाणचे व्हिडीओ शूटिंग करणे, सीसीटीव्ही बसविणेचा निर्णय झाला.
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा, लाईट, रस्ते, गटारींची दुरूस्ती व साफसफाई करून औषध फवारणी केल्याचे सांगीतले. महावितरणच्या कर्मचार्यांनी विद्युत पुरवठ्याचा चोख बंदोवस्त केल्याचे तर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. सचिन भंडारे यांनी आरोग्य यंत्रणा सुसज्ज असल्याचे सांगीतले. यावेळी विविध पदाधिकारी, उत्सवाचे खेळगडी, मानकरी व नागरीक उपस्थित होते.