इचलकरंजीतील पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच सारखी ज्ल्वाहीनेला गळती लागत असल्या कारणाने अधिकच त्रास नागरिकांना करावा लागत आहे. पिण्याच्या इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव पाणी योजनेला विरोध होत असल्याने याप्रश्नी समन्वयातून योग्य तो मार्ग काढून सुळकूड योजना सुरू करून इचलकरंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इचलकरंजी शहराला प्रत्यक्षात ८९ एमएलडी पाण्याची आवश्यकता असल्याने शासनाने सुळकूड उद्भव दूधगंगा नदीवरून अमृत २ अंतर्गत नवीन योजना मंजूर केली आहे.
मात्र, विरोधामुळे योजनेचे काम सुरू झालेले नाही. दूधगंगाऐवजी मजरेवाडी योजनेचे बळकटीकरणाबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुचविले आहे. मात्र, पंचगंगा नदी नृसिंहवाडी येथे ज्याठिकाणी कृष्णा नदीस मिळते. त्यापुढे केवळ ४०० मीटर अंतरावर मजरेवाडी उपसा केंद्र आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषित पाणीच इचलकरंजीवासीयांना मिळत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.