उद्यापासून इचलकरंजी शहरात दुर्गामाता दौड

उद्या घटस्थापना असल्यामुळे इचलकरंजी शहरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शारदीय नवरात्रोत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दररोज दुर्गामाता दौंडचे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्या म्हणजेच 3 ऑक्टोबरला गुरुवारपासून या दौंडचा प्रारंभ होणार असून या दौंडमध्ये युवकांनी हजारांच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.

ही दौंड इचलकरंजी शहरात घटस्थापनेपासून सुरू होणार असून दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोंबर रोजी समारोप होणार आहे. ही दौंड दररोज शहराच्या विविध भागातून जाणार आहे. शहरातील मंदिर, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी स्थापित केलेल्या देवीची आरती देखील केली जाणार आहे.

यावेळी महिला नागरिकांकडून रांगोळी काढून फुलांचा वर्षाव देखील केला जातो. त्यामुळे रोज पहाटे साडेपाच वाजता कॉ. के. एल. मलाबादे चौकात हजारो युवक भगवा फेटा, पांढरी टोपी घालून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.