संसदेचे उद्यापासून अर्थसंकलपीय अधिवेशन आहे. मोदी -२ सरकारच्या काळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार आहे. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर दोन्हीं सभागृहांची बैठक होणार आहे. ज्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची प्रत आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाणार आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरु होत आहे. गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार आहे. नव्या संसदेत राष्ट्रपतींचे पहिलेच अभिभाषण होणार आहे.