आयुष्मान योजना घेऊन रुग्णांना लाभ न देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सात रुग्णालयांवर आज कारवाई करण्यात आली.या रुग्णालयांकडून ही योजना काढून घेण्यात आली. या रुग्णालयांबद्दल आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. आयुष्मान भारत मिशन, महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज बैठक घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले.
तसेच आयुष्मान कार्ड वितरित करण्यात जिल्हा आघाडीवर असल्याबद्दल त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. आयुष्मान भारत योजनेची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त आरोग्य अधिकारी संजय रणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुक देसाई तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.