देशभरात अॅमेझॉन , फ्लिपकार्ट साऱख्या ऑनलाईन साईटसवर अनेक वेळा ऑफर देण्यात येते. आज OTT चा जमाना असला तरी अनेक प्रेक्षक आहेत त्यांना चित्रपट थिएटर्समध्ये जाऊन बघायला आवडतात. पण आजकाल तिकीटाची किंमत पाहिली तर चित्रपटगृहाता जायला पण शंभर वेळा विचार करावा लागतो. पण सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने घोषणा केली आहे की, ऑक्टोबरमधील या तारखेला फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे.
काय आहे ऑफर आणि तिकिटाची रक्कम इतकी कमी का?
यावर्षी 13 ऑक्टोबरला मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि देशभरातील विविध चित्रपटगृहात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करणार आहेत. त्यामुळे 13 ऑक्टोबरला चित्रपटाची तिकिटे 99 रुपये इतकी असणार आहे. 4DX आणि IMAX सारख्या रिक्लिनर्स आणि प्रीमियम फॉरमॅटसाठी ही किंमत बदलणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
PVR, Inox, Cinepolis, Miraj, Citypride, Asian, Mukta A2, Movie Time, WAVE, M2K, Delite आणि इतर सारख्या लोकप्रिय साखळ्यांसह 4,000 हून अधिक स्क्रीन 13 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करणार आहेत. देशभरातील चित्रपटप्रेमी केवळ 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. चित्रपटगृहांमध्ये उपस्थिती वाढवण्यासाठी MAI ने हा निर्णय घेतलाय.
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने 2022 मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. 2022 मध्ये 16 सप्टेंबर हा दिवश राष्ट्रीय सिनेमा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानंतर तो 23 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र हा लोकप्रिय चित्रपट त्यावर्षी 16 सप्टेंबरथिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यावर्षीही पुन्हा तारखा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 13 ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात येणार आहे.
असं करा तिकीट बुक
ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि PVR, BookMyShow, Paytm इ. सारख्या वेबसाइटवर 13 ऑक्टोबरला तुम्ही तिकिटं रु.99 मध्ये बुक करू शकता.
तुमच्या पसंतीच्या सिनेमा नेटवर्कवर जा (उदाहरणार्थ: BookMyShow)
BookMyShow ला भेट द्या
तुमचं शहर निवडा
सर्व तिकिटं भारतात रु.99 मध्ये उपलब्ध असतील
तारीख आणि वेळ स्लॉट निवडा
पेमेंट पूर्ण करा
13 ऑक्टोबरला रिलीज होणार चित्रपट
White Punjab 2023, Guthlee Ladoo 2023 आणि Bombay 2023 हे चित्रपट तुम्हाला 99 रुपयात पाहता येणार आहे.