विट्यात उद्या गुरुवारपासून सर्वरोग निदान शिबिर! मोफत औषधोपचार

अलीकडच्या काळात गावोगावी अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते. जेणेकरून सर्व सामान्य जनतेला त्याचा पुरेपूर लाभ होईल. विटा येथे उद्या गुरुवारपासून सर्व नि९दन शिबिराचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दि. १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत सर्व रोग निदान, शस्त्रक्रिया व दंतरोग आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली. डॉ. कदम म्हणाले, विटा येथे
गुरुवार, दि. १ फेब्रुवारीला शिबिराला सुरुवात होणार आहे.

पहिल्या दिवशी प्राथमिक रुग्ण तपासणी, विटा ग्रामीण रुग्णालयात करता येण्यासारख्या शस्त्रक्रिया, दंत उपचार करण्यासाठी पात्र लाभार्थी रुग्णांची पूर्वतपासणी करण्यात येणार आहेत. तसेच दि. २ व ३ फेब्रुवारीला गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. दि. ४ रोजी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांचा पाठपुरावा करून उर्वरित पात्र रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे या शिबिराचा पुरेपूर लाभ जनतेने घ्यावा.