शिधापत्रिकेवर अनेक लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत आहेत. तसेच आनंदाचा शिधा, गहू, तांदूळ यांसारखे धान्य मिळते. इचलकरंजी शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर नसलेल्या केशरी आणि पिवळ्या कार्डधारकांना तांत्रिक अडचणीमुळे धान्य मिळत नाही. ही अडचण दूर करून त्या कुटुंबीयांना १२ अंकी नंबर टाकून पुन्हा धान्य देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने प्रांताधिकाऱ्यांकडे केली.
रेशनकार्डवर १२ अंकी नंबर टाकून त्यांना धान्य देण्यास सुरुवात करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी युवती सेना जिल्हा अध्यक्ष सलोनी शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, दीपा देसाई, शकुंतला पाटील, संदीप माने, दीपक पाटील उपस्थित होते.