हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून…….

सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. म्हणजेच प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून इंडिया आघाडीतून उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

सरूडकर घराण्याने किमान पाच वेळा विधानसभा निवडणुका जिंकलेल्या आहेत. तर दोन वेळच्या निवडणुकीमध्ये यांना हार मानावी लागली. उद्धव ठाकरे सेनेचे ते निष्ठावंत माजी आमदार मानले जातात.