आटपाडीत रविवारी आदर्श पतसंस्था सचिव पुरस्काराचे वितरण

आटपाडी येथील मोफत वाचनालय विद्यानगर व सहकार भारती यांच्यातर्फे आदर्श पतसंस्था सचिव पुरस्काराचे वितरण रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी चौंडेश्वरी मंदिरामध्ये होणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष एस. एन. पाटील यांनी दिली.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सुनील भिंगे, सहकार भारतीचे ग्रामीण जिल्हा महामंत्री सतीश भिंगे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब माळी, उपाध्यक्ष चंद्रकांत दौडे, पतसंस्था प्रकाश प्रकोष्ट दत्तात्रय स्वामी उपस्थित होते. आटपाडी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष व शिक्षण प्रसारक बी. ए. भिंगे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी पतसंस्था चळवळीमध्ये चांगले काम करणाऱ्यास पुरस्कार दिला जातो.

आटपाडीतील चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सचिव बालक डोईफोडे यांना आदर्श सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. यानिमित्ताने सांगली जिल्ह्यात सहकार भारतीचे काम कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.