आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कडेगाव तालुक्यातील रामापुर, कमळापूर, येरळा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी जेष्ठ नेते माजी आमदार मा. मोहनशेठ दादा कदम, आम. डॉ. विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम, खासदार मा. विशालदादा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. सुहासभैया बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. शांताराम बापू कदम, युवानेते मा.डॉ. जितेश भैया कदम व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कदम बाबर याराना पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याची चर्चा सुरू झालेली असतानाच बाबर व खासदार विशाल पाटील सिलसिला जारी आहे. पूर्वी दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार मोहन शेठ दादा कदम, दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर हे मतदारसंघाच्या बाबतीत एकत्रित असायचे. त्यामुळे आता कदम, बाबर नव्या पिढीने एकत्रित येऊन निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाच्या निमित्ताने केलेल्या या कार्यक्रमामुळे मतदारसंघात सर्वत्र चर्चा आहे.