आटपाडीत तापमान वाढीने रसवंतीगृहात गर्दी; शीतपेयांना नागरिकांची मोठी पसंती

आटपाडी शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उन्हाच्या काहिलीने थंडाव्यासाठी रस्त्यावरील रसवंतीगृह व शितपेयांच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. वातावरणात सकाळी लवकर संध्याकाळी गारवा असला, तरी सकाळी दहा वाजल्यापासूनच तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे आटपाडी शहरातील भागात आटपाडी बस स्टॅन्ड, बाजार पटांगण, कॉलेज कॉर्नर, आबा नगर चौक, साठे नगर चौक, पंचायत समिती, कोर्ट परिसर, पोलीस स्टेशन ते कारखाना पाटी या ठिकाणी उसाच्या रसाची, फळांच्या रसाची व शीतपेयांची दुकाने थाटलेली आहेत.

प्रवाशांचे पाय शीतपेय व रसवंती गृहांकडे आपोआप वळत आहेत. उसाच्या थंडगार ताज्या रसाला अधिक पसंती दिली जात आहे. आणि आटपाडी तालुक्यातील रस्त्याकडेला ठिकठिकाणी रसवंती गृहे सुरू आहेत. त्याठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आणि तापमान वाढल्याने रस्त्यावर नेहमीच अनेक तालुक्यातील व अन्य गावातील ये-जा करणाऱ्यांची गर्दी असल्याने रसवंतीगृहावर मोठी गर्दी होताना अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.