अर्थसंकल्पाचा पेटारा आज उघडणार……

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता त्या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. हे अंतरिम बजेट असले तरी सीतारमण यांच्या पेटाऱ्यात काही तरी खास असेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या 2.0 मधील या शेवटच्या अर्थसंकल्प आहे. त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. परंतु निवडणुकीमुळे लोकप्रिय घोषणा अर्थसंकल्पात असण्याची शक्यता निर्मला सीतारमण यांच्याकडून आहे.

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या देशाचा अर्थसंकल्प मांडतील.देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर होणार आहे. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार नाही. पण, निवडणुकीच्या वर्षांत सरकार मोठ्या घोषणा करू शकते.आज बजेटमध्ये रेल्वे संदर्भात काही मोठ्या घोषणा होऊ शकतात.

2024 मध्ये रेल्वेसाठी जास्त निधीची तरतूद केली जाऊ शकते. 2024-25 मध्ये रेल्वे बजेट 3 लाख कोटीच्या पुढे जाऊ शकतो.बजेटमध्ये आज इलेक्ट्रिक व्हेइलकलबद्दल महत्त्वाची घोषणा होऊ शकते. 12500 कोटी रुपयांची तरतूद आहे. यात सर्व इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्या आहेत. इलेक्ट्रिक व्हेइकल आणि हायब्रिड गाड्यांसाठी सब्सिडी कायम राहिलं.भाजपने तीन राज्यांत नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे.

या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा होऊ शकते.अंतरिम अर्थसंकल्प एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या आवश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी संसदेची मंजुरी या अंतरिम अर्थसंकल्पात घेण्यात येणार आहे. एप्रिल/मे मध्ये सार्वत्रिक निवडणुकांनंतर निवडून आलेले नवीन सरकार जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत सकाळी ११ वाजता तर केंद्रीय अर्खराज्यमंत्री डॉ. भागवत कराड राज्यसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे.