काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सांगली दौऱ्यावर आले होते. शरद पवारांच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार 5 फेब्रुवारीला सांगली जिल्ह्याचा दौऱ्यावर येणार आहेत.अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विटा आणि जत येथे शेतकरी मेळावे, पक्षप्रवेश अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
पण शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे अकाली निधन झाल्याने अजित पवार गटाचा मेळावा आणि पक्षप्रवेशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यात अजित पवार बाबर कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन करणार आहेत.
आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांच्या निधनाने कोणतेही शक्तीप्रदर्शन करू नये, अशा सूचना खुद्द अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा आहे.आमदार बाबर यांच्या निधनामुळे पक्षप्रवेश, पक्षाची बैठक व मेळावा रद्द केले आहेत.
मात्र काही दिवसातच पुन्हा अजित पवार जिल्हा दौर्यावर येणार असून त्यावेळी पक्षाचा मेळावा व पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे.