सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत अनेक वाहने जप्त केली आहेत. या जप्त करण्यात आलेल्या २४ वाहनांचा ई-लिलाव १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे. या जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, ऑटोरिक्षा गुडस् या वाहनांचा समावेश आहे.
जप्त वाहने चिंचोळी एम.आय.डी.सी. येथील आवारात १३ फेब्रुवारी २०२४ याकालावधीत कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहीर ई- लिलावात सहभागी होण्यासाठी ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ याकालावधीत सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे खटला विभागात सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्यके वाहनांसाठी ५० हजार रुपये रकमेचा DYRTO SOLAPUR या नावे अनामत रकमेच्या डिमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नावनोंदणी व कागदपत्रे पडताळणी अप्रूव्हल करुन घेणे गरजेचे आहे.
