अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच सांगली जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरून अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार असल्याचे सांगत वेळापत्रक जाहीर केले.मात्र, तिकिट बुकिंग सुरूच झाले नसल्याने प्रवाशांच्या पदरी प्रतीक्षा करण्याशिवाय काहीही उरलेले नाही.
काही प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता, बुकिंगबाबत कोणाला काहीच कल्पना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तिकिट बुकिंग कधी सुरू होणार, याबाबत शंका उपस्थित होत आहे. बुकिंग सुरू नसल्याने अयोध्येला जाऊ पाहणाऱ्या भाविकांचा खोळंबा झाला आहे. त्यांना नियोजन करतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे बुकिंग सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.