लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूटची राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संमेलन २०२५ ही परिषद उत्साहात संपन्न झाली. ही परिषद येथील आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या पॉलिटेक्निकलच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागामार्फत घेण्यात आली. शैक्षणिक संशोधन आणि सहकार्यांच्या दिशेने एक महत्वपूर्ण ठरली. या कार्यक्रमाचे संयोजन इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागप्रमुख श्री. एस. एस. घाटगे यांनी केले. समन्वयक म्हणून बी. डी. शेळके व व्ही. बी. बनसोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ए. ए. मुल्ला आणि प्रा. जी. एस. चौधरी यांनी इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार क्षेत्रातील प्रगती आणि संशोधन व नवकल्पना याविषयी मार्गदर्शन केले.
आदर्श तंत्रज्ञान व संशोधन संमेलन २०२५ परिषदेचे प्रमुख समन्वयक एस. एस. घाटगे यांनी स्वागत करून विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील नवप्रवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांनी अशा परिषदेतून शैक्षणिक ज्ञानवृद्धीसाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. या परिषदेसाठी एकूण ८२ संशोधन निबंध प्राप्त झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या परिषदेला एकूण ४१० विद्यार्थी उपस्थित होते. या परिषदेस संस्थेचे माजी नगराध्यक्ष ड. वैभव पाटील आणि कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, संचालिका पूजा पाटील, प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील आणि रजिस्ट्रार ए. डी. चव्हाण यांचे सहकार्य लाभले. यावेळी विभागप्रमुख प्राध्यापक उपस्थित होते.