सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आलेला आपणाला पाहायला मिळत आहे. कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. सुहासभैय्या बाबर यांनी वैभवदादा आणि पडळकर बंधूंना तगड आव्हान दिलेले आहे. महायुतीकडून माझी उमेदवारी फायनल असल्याने विरोधकांना अन्य पक्षातून किंवा अपक्ष लढावे लागेल असा दावा विकास कामासंदर्भातील पत्रकार परिषदेत सुहास भैय्यांनी केलेला आहे.
आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या वैभव दादा पाटील आणि पडळकर यांना सुहास भैय्या बाबर यांनी तगडं आव्हान दिल्याचं दिसून येत आहे. 60 कोटींचा निधी उपलब्ध झाल्यासंदर्भात विटांमध्ये सुहासभैय्या बाबर यांनी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. जवळजवळ एक हजार कोटींचा टप्पा आपण पूर्ण केल्याचे सुहासभैय्यानी सांगितले आहे.
तसेच मतदार संघात 40 किलोमीटर रस्त्यांसाठी 60 कोटींचा निधी सुहासभैय्यानी नव्याने मंजूर केलाय तर मतदार संघातील ग्रामीण भागात आता काँक्रिटचे रस्ते होणार असल्याचे देखील सुहासभैय्यानी स्पष्ट केले आहे. अनिल भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत यासाठी महायुतीकडून मिळालेल्या मोठ्या सहकार्यासाठी सुहासभैय्यानी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांचे आभार देखील मानले.