टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सानियाने शोएबसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत.सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकची जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण आता त्यांच्यात अलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. सानियाने सोशल मीडियावरुन शोएबसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. त्यामुळे आता सानिया आणि शोएबचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अद्याप सानिया किंवा शोएबने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पण आता तिने सोशल मीडियावरुन शोएबसोबतचे फोटो डिलीट केले आहेत.
त्यामुळे सानिया आणि शोएबमध्ये दुरावा आल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शोएबनेदेखील इंस्टाग्राम बायोमधील सानियासोबत लग्न झाल्याची माहिती काढून टाकली आहे. याआधी त्याने ‘सुपरवुमनचा पती’ असं बायोमध्ये लिहिलं होतं.