आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार हालचाली सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत. तसेच मतदार याद्या पक्षांकडून प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे लक्ष पूर्णतः पक्षांच्या मतदार याद्यांकडे लागून राहिलेले आहे. अशातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. राहुल आवाडे यांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीस उमेदवार उभा करण्यासाठी महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी सुरू झालेली आहे.
त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळे माजी नगराध्यक्ष संजय कांबळे यांचे नाव पुढे आलेले आहे. त्यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ही संधी साधावी अशी चर्चा जनमतात सुरू आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कांबळे यांच्या नावाची शिफारस प्रदेशकडे केलेली आहे. त्यामुळे या चर्चेला बळ मिळाल्यामुळे महाविकास आघाडी कडून संजय कांबळे उमेदवार असतील तर इचलकरंजीची लढत लक्षवेधी ठरणार आहे.