बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन पुन्हा सुरु झाले आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यंदा लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लवकरच आपला बायफ्रेंड जॅकी भगनानीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.अभिनेत्रीच्या घरी प्री-वेडिंग पंक्शनला सुरुवात झाली आहे. आता यातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.
श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिच्या एका पोस्टने चाहलग्नाची तारीख निश्चित करण्याबद्दल त्यांचे लक्ष वेधलं आहे. श्रद्धानं चाहत्यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला आहे.
श्रद्धा कपूरने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करून श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी छान दिसत आहे ना, मी लग्न करावं का?”. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.