गेल्या पाच दिवसांपासून नॉटरिचेबल असल्याचं समोर आलं आहे. संभाजीराजे नॉट रिचेबल झाल्यामुळे राज3 जानेवारी पासून नियोजित असलेले जिल्ह्याचे दौरे अचानक रद्द केले आहेत. कीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. संभाजीराजे यांचे रविवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात दौरे सुरु होणार होते. पण, दौऱ्यांना अनुपस्थित राहत संभाजीराजे छत्रपती नॉटरिचेबल झाल्याची माहिती आहे. संभाजीराजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार होते पण ते गेल्या काही दिवसांपासून गायब आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. 11 फेब्रुवारीला वाढदिवसाच्या कार्यक्रमात संभाजीराजे यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वाढदिवसानंतर संभाजीराजे छत्रपती यांचे मतदारसंघात दौरे सुरू होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.