लोकसभा निवडणुकाच (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यात प्रत्येक पक्षानं आपापले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रक्षप्रवेशांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार, खासदारही मूळ पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच प्रत्येक पक्षाकडून अनेक मोठ-मोठे दावे केले जात आहेत.
अजित दादांच्या (Ajit Pawar Group) गटातील एका मोठ्या मंत्र्यानं केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटानं उमेदवारी जाहीर केली असली, तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)मंत्री धर्मबाबा आत्राम (Dharma Baba Atram) यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (अजित पवार गट) आणि मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी माहिती दिली की, “शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. असं असलं तरीसुद्धा ते कधीपण अजित पवार गटात येऊ शकतात.
शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहावं, असा सल्लाही धर्माबाबा अत्राम यांनी दिला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांपेक्षा अजित पवारांचा चेहरा मोठा आहे. त्यामुळे शरद पवार यांना सहानभूती मिळणार नसल्याचं धर्माबाबा अत्राम म्हणाले आहेत.