सरकार अनेक नवनवीन योजना सतत राबवीत असतात. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ घेता येईल. विध्यार्थ्यांसाठी देखील अनेक उपक्रम सुद्धा आमलात आणले जातात. केंद्र सरकारच्यावतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेत मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील विद्यार्थी विकास विद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यातील १८ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. तसेच
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत २२ विद्यार्थ्यांनी तर इंटरमिजिएट परिक्षेत १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
येथील विद्यार्थी विकास विद्यालयाचे एन. एम. एम. एस. परीक्षेस ४० विद्यार्थी बसले होते. जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनच्या विचार संस्कार परीक्षेत या विद्यालयाच्या पूर्वा व आरती जाधव यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला.
मोहित्यांचे वडगाव येथील विद्यार्थी विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.