लष्करात नोकरीची सुवर्णसंधी….

भारतीय लष्करात नोकरीची  सुवर्णसंधी आहे. उच्च शिक्षण पूर्ण करून लष्कराची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्यात भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशनने 381 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 23 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. यासाठी तुम्हाला joinindianarmy.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. 

लष्कर शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरतीसाठी इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला अभियांत्रिकी पदवीधर आणि भारतीय सशस्त्र दलाच्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना हा अर्ज ऑनलाइन करावा लागेल. इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनने अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे.

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 23 जानेवारी 2024 

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024

शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. लष्कराच्या अधिकृत भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरती अंतर्गत 381 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 350 पदे SSC (Tech) पुरुषांसाठी, 29 SSC (Tech) महिलांसाठी आणि 2 पदे संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा उमेदवारांसाठी आहेत.

इंडिया आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Tech) पुरुष, महिला उमेदवारांसाठी, 01 ऑक्टोबर 2024 रोजी वय 20 ते 27 वर्ष यादरम्यान असावे. भारतीय सशस्त्र दलाच्या विधवांसाठी, 1 ऑक्टोबर 2024 रोजी कमाल वय 35 वर्षे आहे.

भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार जे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणारे उमेदवारही या भरतीअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील. निवडलेल्या उमेदवारांना अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या तारखेपासून किंवा प्री-कमिशन ट्रेनिंग अकादमी येथे अहवाल देण्याच्या तारखेपासून लेफ्टनंटच्या रँकमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल.