अजितदादांचा एकेकाळचा कट्टर समर्थक, शरद पवारांच्या भेटीला

एकेकाळी पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले आझमभाई पानसरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आझम पानसरे यांचे मोठे नाव आहे. अजित पवार यांचे जवळचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात पानसरे यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, काही कालावधी नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने पिंपरी चिंचवडच्या राजकारणात चुरस निर्माण होणार आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी विशेष लक्ष घातल्याचे पहायला मिळत आहे. त्यात एकेकाळी राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये मजबूत करण्यासाठी हातभार लावला त्यात लक्ष्मण जगताप, आझम पानसरे यांची नावे आघाडीवर होती. काही कारणाने त्यांनी भाजपसोबत गेले होते. त्या नंतर राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला होता.

मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्याने शरद पवार हे तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. त्यात अनेक जुने दिग्गज देखील शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आझम पानसरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रतिकृती परिस्थितीत आझमभाई यांनी राष्ट्रवादीची खिंड लढवली. पिंपरी चिंचवड मध्ये पानसरे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना मानणारा गट मोठा आहे.

भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश.केला होता. महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी आझम पानसरे यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला होता. मात्र काही वर्षांच्या कालावधीनंतर स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. आझम पानसरे यांच्या सोबत शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. शरद पवार साहेबांशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आझम पानसरे यांनी शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे तुषार कामठे यांनी सांगितले आहे.