आपल्या हटके आणि भन्नाट ड्रेसिंग सेन्समुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद ही कधी काय फॅशन करेल याचा नेम नाही.
तिने नुकतीच एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली होती त्यानंतर ती चर्चेत आली. उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते तिने कधी सायकलची चैन तर कधी कंगवा अशा अनेक वस्तूंचा वापर करुन ड्रेस तयार केले आहेत.
आता मात्र उर्फीनं अशा वस्तूपासून ड्रेस तयार केला आहे की ते पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा डोक्याला हात लावला आहे.
आता उर्फीनं सिगारेटच्या थोटक्यांचा वापर करुन ड्रेस तयार केला आहे. तिने रस्त्यावरून ही एक एक करत ही थोटकं गोळा केली आहे. याचा वापर करत तिने आपला नवा ड्रेस तयार केला आहे. उर्फीच्या या नवीन ड्रेसचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उर्फीनं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की उर्फी रस्त्यावर सिगारेटच्या थोटकं गोळा करत आहे. यानंतर उर्फी ती एक-एक करून ही सर्व थोटकं तिच्या ड्रेसला जोडली आणि काही वेळातच तयार झाला तो उर्फी जावेदचा नवा ड्रेस.
उर्फी जावेदने सिगारेटपासून ऑफ शोल्डर ड्रेस बनवला. उर्फी या ड्रेसमध्ये खुपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिने हा ड्रेस परिधान करुन वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
उर्फी जावेदने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘हा ड्रेस बनवल्यानंतर अनेक दिवस माझ्या हातांचा सिगारेटचा वास येत होता.’