थकबाकीदारांचे गाळे व मालमत्ता केले सिल……

सांगोला नगरपरिषदेमार्फत मागील दोन महिन्यांपासून कर वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत थकबाकीदारांना भाडे व कराच्या रक्कमा भरणेबाबत नियक्त अधिकारी व कर्मचारी
यांचेमार्फत वारंवार सूचना देण्यात येत आहेत.

परंतु तरीदेखील थकीत भाडे व कराच्या रक्कमा भरणा न झालेने मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद मालकीचे एकूण ७ गाळे थकीत भाडे व कराच्या रकमेपोटी सिल करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने विशेष वसुली मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद संचालनालयाकडून वारंवार आढावा व सूचना देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरपरिषद मालकीचे गाळे सील करण्यात आले.