मनपाडळे येथील 77 लाभार्थींना संजय गांधी निराधार अनुदान योजना व 48 लाभार्थ्यांना रेशन मंजूर केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने आमदार राजूबाबा आवळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजय पाटील, महिपती दबडे, महादेव दबडे, वसंत चौगुले, राहुल पाटील, सोसायटी चेअरमन विलास पाटील, अरुण शिंदे,धोंडीराम सूर्यवंशी, गाव कामगार तलाठी पवन सुतार, कोतवाल संतोष खांडेकर, अशोक शिंदे , गणेश दबडे, नंदू दबडे, कुबेर चौगुले, अविनाश पाटील, रणजीत पाटील , प्रशांत दबडे आदी उपस्थित होते.