गेल्या काही दिवसापासून असलेली प्रतीक्षा आता संपली आहे .डिसेंबरमध्ये झालेल्या ऑक्शननंतर पाच संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले होते. अखेर वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेची उत्सुकता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिलं पर्व मुंबई इंडियन्सने जिंकलं होतं. यंदाही जेतेपदावर नाव कोरण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज आहे. पहिल्या पर्वापेक्षा यंदाच्या स्पर्धेत जोरदार चुरस पाहायला मिळेल अशी चर्चा आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला सामना शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. डब्ल्यूपीएल 2024 च्या पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 च्या विविध चॅनेलवर आणि कलर्स सिनेप्लेक्सवर देखील पाहता येईल. तर जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर पूर्णपणे विनामूल्य पाहता येईल.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने गेल्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं होतं. तसेच जेतेपदावर नाव कोरलं होतं. मुंबई इंडियन्सने 8 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिली होती. पण डिसेंबर महिन्यात झालेल्या लिलावत मुंबईने हीदर ग्राहम, धरा गुज्जर, सोनम यादव आणि नीलम बीष्ट यांना रिलीज केलं होतं. तसेच 13 खेळाडूंना रिटेन केलं होतं. तसेच शबनिम इस्माईसाठी 1.20 कोटी मोजले. तसेच सजीवन संजना, अमनदीप कौर, कीर्तन बालाकृष्णन आणि फातिमा जाफरला संघात सहभागी करून घेतलं.