मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर, सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने एकहाती सत्ता राखली आहे. विधानसभा निवडणुकीतल्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्यात आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.मुख्यमंत्री कोण होणार? कुणाला कोणती खाती मिळणार यावर मंथन सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.दुसरीकडे परंतु तूर्तास सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २७ ते २९ नोव्हेंबरच्या दरम्यान शपथविधी सोहळा होण्याचे संकेत मिळत आहेत.महायुतीला पूर्ण बहुमत मिळालेले असल्यामुळे कुठलीही धाकधूक नाही. त्यामुळे घाई न करता व्यवस्थित निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची दिल्लीत संयुक्त बैठक होईल. या बैठकीत पुढील चित्र स्पष्ट होईल.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची निवड (Mahayuti Government) होईल. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिघा प्रमुख नेत्यांचा त्यानुसार शपथविधी होईल. बुधवार २७ ते शुक्रवार २९ नोव्हेंबर या तारखांच्या दरम्यान शपथविधी होण्याचे संकेत मिळत आहेत. उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नंतर होणार असल्याची चर्चा आहे.