भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. या स्पर्धेत त्याने कमी सामने खेळून सर्वाधिक गडी बाद केले होते. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं आह
आता शमीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार मोहम्मद शमी आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमी आयपीएल स्पर्धेतून बाहेर होणं हा गुजरात टायटन्स आणि भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे.