3 मार्चला लग्नकार्य असणाऱ्यांनी मुहूर्त बदलावा; दुपारचं लग्न संध्याकाळी करावं

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही.

24 फेब्रुवारीपासून सलग रास्तारोको आंदोलनं होणार. मराठ्यांनी गावागावात रास्तारोको करायचा आहे. लग्नकार्य असणाऱ्यांनी मुहूर्त बदलावा. दुपारचं लग्न संध्याकाळी करावं.

आजपासून 3 मार्चच्या रास्तारोकोची तयारी करा. 3 मार्चला प्रत्येक जिल्ह्यात मोठा रास्तारोको. देशात कधीच झाला नसेल असा 3 मार्चला रास्तारोको. एकाच ठिकाणी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे. परीक्षा सुरु असल्याने शांततेत आंदोलन करायचं. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.