मंगळवेढा येथील शिवप्रेमी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्याबाबत आज सर्व शिवभक्तांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांची भेट घेतली आहे.दोन दिवसात कामात सुरुवात न झाल्यास नगरपालिकेसमोर बेमुदत हे आंदोलन करणार असल्याचा इशारा सर्व शिवभक्तांनी दिला आहे.
मंगळवेढा शहरामध्ये शिवप्रेमी चौक येथे गट नंबर 26 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा या ठिकाणी परिसर सुशोभीकरण करणे या कामाची निविदा आचारसंहितेमुळे प्रलंबित होती.
आचारसंहितेनंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून तात्काळ निविदा उघडून सदर काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदार अस देण्यात यावे.सदर प्रक्रिया दोन दिवसात म्हणजेच गुरुवार दिनांक 27 जून पर्यंत न झाल्यास मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील समस्त शिवभक्त नगरपालिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे.