हातकणंगलेत अवैधरित्या गॅस सिलेंडरचा काळाबाजार

अलीकडच्या काळात अनेक अवैध धंदे सुरु आहेत. असाच एक काळा बाजार उघडकीस आलेला अआहे. यळगूड (ता. हातकणंगले) भारत गॅस सिलिंडरचा काळाबाजार करून साठा करणारा व बेकायदेशीर वाहनात गॅस भरून पैसे मिळवणाऱ्या आरोपींवर हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बाहुबली शांतीनाथ उपाध्ये ( वय ३५ रा.जैन मंदिर जवळ यळगूड) असे आरोपीचे नाव आहे ही धडक कारवाई दहशतवाद विरोधी पथक कोल्हापूर यांनी केली आहे. त्यांचेकडून रोख रक्कमेसह ९० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेने खळबळ उडाली आहे.

यळगूड येथे नागरी वस्तीत अनधिकृतपणे गॅस सिलिंडरचा अवैध साठा केला होता यामध्ये रिकामे सिलेंडर ७ किंमत २० हजार, भरलेले सिलेंडर २३ किंमत ६३ हजार ६००, गॅस सिलिंडर भरणाऱ्या नोजलसह इलेक्ट्रॉनिक मोटर ४ हजार १००, वजन काटा व रोख रक्कम ३ हजार असा एकूण ९० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोणतीही सुरक्षित अग्निरोधक सामुग्री जवळ न बाळगता कृत्रीम गॅसचा तुटवडा करून साठा केला आहे. असा ठपका ठेवून हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

ही धडक कारवाई सहा. फौजदार सुनील कवळेकर, शेखर सवतेतर, पोहेकॉ आनंदराव पाटील, अबबक्र शेख गजानना कुहाडे या पथकाने केली याची फिर्याद सहा. फौजदार प्रकाश शामराव नरके नेमणूक दहशतवाद विरोधी पथक कोल्हापूर यांनी दिली आहे.