इस्लामपुरात २ मार्चपासून बॅडमिंटन स्पर्धा

इस्लामपुरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका शटल बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने दि. २ व ३ मार्च रोजी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू इनडोअर स्टेडियममध्ये मुले-मुली व पुरुष (खुला गट) एकेरी व दुहेरी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे.

मुले व मुली (एकेरी) ९, ११, १३ व १५ वर्षे वयोगट. दुहेरी- मुले १५ वर्षाखालील, पुरुष खुला गट- ३५ वर्षावरील, ४५ वर्षावरील गट. प्रवेश फी- एकेरी गटासाठी रुपये ५००, तर दुहेरीसाठी रुपये ८०० आहे. राज्य बॅडमिंटन व जिल्हा बॅडमिंटन असो.च्या नियमाने स्पर्धा खेळविली जाईल. दि. २६ फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी. इच्छुक खेळाडूंनी धनाजी माने – ९८३४० १४१९९ व अमोल पवार- ८०८०८ ३५५९३ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.