कोरोचीत मारामारी; परस्पर विरोधी तक्रारी दाखल

मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तिघांना सात जणांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोरोची (Korochi) गावभाग जैन मंदीराजवळ घडली. याप्रकरणी ओंकार महादेव चव्हाण (वय २१, रा. इंदिरानगर, कोरोची) याचे फिर्यादीनुसार सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जुन्या वादातून पाच जणांनी मारहाण करून घराच् खिडकीच्या काचा फोडून नुकसान केल्याची फिर्याद दिप उपाध्ये याने दिली असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्परविरोधी तक्रारी दिल्याने एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी ओंकार चव्हाण याचा मित्र साजिद मुल्ला याला दिप उपाध्ये याचे कानशिलात मारली होती. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी चव्हाण, त्याचा मित्र साजिद मुल्ला तसेच संकेत शेवाळे हे तिघे दिप उपाध्ये याचे घरासमोर रात्री ९ वाजता गेले होते. याप्रसंगी उपाध्ये याने अन्य सहाजणांना बोलावून जमाव जमवून या तिघांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानुसार दिप उपाध्ये, अरूण शेट्टी, अक्षय शेट्टी, दिपक तेली, अभी गुरव, रणजित शिंदे, सुशांत पाटील सर्व रा. कोरोची  यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दिप उपाध्ये याने दिलेल्या फिर्यादीनुसार ओंकार चव्हाण, संकेत शेवाळे, संदीप मेंडगुळे, साजिद मुल्ला यांनी जुन्या वादातून आपणास मारहाण करून घराच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केल्याने म्हटले आहे. त्यानुसार संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.