अभिमन्यू पाटील यांना ‘ महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

अपंग शिक्षण मंडळ संचालित येथील डॉ. व्ही . एस . नेर्लेकर मूकबधिर विद्यालयाचे सहसचिव व वरिष्ठ मुख्याधापक अभिमन्यू पाटील यांना पुणे येथील गणेश विटकर युवा फाउंडेशन पुणे यांच्यावतीने उत्कृष्ट संस्था व शाळेच्या व्यवस्थापनाबद्दल ‘ महाराष्ट्र भूषण ‘ सन्मान पुरस्कार प्रदान कारण्यात आला . सिनेअभनेत्री पुष्पा चौधरी यांच्या हस्ते हा पुरस्कार पुणे येथील कार्यक्रमात देण्यात आला.

संस्थचे संस्थापक मोहनराव रानमाळे पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यंना शिक्षण व पुनर्वसन करण्याच्या हेतूने अपंग शिक्षण मंडळ संस्थेची स्थापना केली . वडिलांच्या निधनानंतर पाटील हे मूकबधिर विद्यार्थ्यांचे शिक्षण पुनर्वसन करण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. संस्थेत बालवर्गापासून इयत्ता दहावीपर्यंत मोफत शिक्षणाची सोया आहे. प्रत्येकवर्षी इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के असतो. त्यांच्या या निवडीबद्दल अध्यक्ष आनंदराव खडके , उपाध्यक्ष सतीश महाडिक , खजिनदार शोभाताई पाटील , अधीक्षिका सुरेख पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.