दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आपल्याला पाहायला मिळतच आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे देखील अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशातच हातकलंगले रस्त्यावर आळते गावाशेजारी रस्त्याच्या किनाऱ्यावरून बांबूने भरलेला बोलेरो टेम्पो गाडी घसरून पलटी झाल्यामुळे दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत.
यामध्ये एका महिलेचा समावेश असून त्यांना प्रवीण जनगोंडा यांच्या रुग्णवाहिकेतून सद्दाम मुजावर यांनी त्वरित हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.