मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना! कोणाला, किती सिलेंडर मिळणार? सविस्तर………

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.या योजनेंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन-तीन गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर दिले जातील.

महाराष्ट्राचा 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश करण्यात आलाय. त्यातील एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजना. या योजनेंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याआधीच महाराष्ट्र सरकार जनतेच्या हितासाठी एकामागून एक योजना सुरू करत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

लाभार्थ्यांकडे वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच घेऊ शकतात.

लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादेत असावं.

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेंतर्गत आता ५ सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर दिले जातील.