महाराष्ट्र विधिमंडळाच्या आवारात आज एक अप्रिय घटना घडल्याची चर्चा आहे. ज्या विधिमंडळात कायदे बनवले जातात, ज्यांच्याकडून जनतेला सभ्य कारभाराची अपेक्षा असते, त्याच विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आज दुपारी दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याच वृत्त आहे. महत्त्वाच म्हणजे सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाचे हे दोन आमदार आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याच वृत्त आहे. नाशिक जिल्ह्यातून येणारे मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाली. नेमक या वादामागे काय कारण आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. दादा भुसे यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना दिसले.
महेंद्र थोरवे हे कर्जतचे आमदार आहेत. दोनवर्षापूर्वी शिवसेनेत बंड झालं, तेव्हापासून हे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात वाद इतका वाढला की, भरतशेठ गोगावले आणि आमदार शंभुराजे देसाई यांना मध्यस्थी करावी लागली असं बोलल जातय.