मोठी बातमी! मनोज जरांगे तात्काळ खाजगी रुग्णालयातील…

 मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने रात्री त्यांच्यावर आंतरवालीतच उपचार सुरू करण्यात आले आहेत. जरांगे यांच्या छातीत दुखत असल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तात्काळ आंतरवालीत पोहचले. जरांगे यांच्यावर रात्रीच तातडीने उपचार सुरु करण्यात आले. रात्री दहा आणि दीड वाजता जरांगे यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. त्यात कुठलाही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी आंतरवालीतच त्यांच्यावर उपचार केले. ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना बरं वाटत असल्याने शुक्रवारी त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता. दरम्यान,  डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीला पोहचले होते. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, रात्रीच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्रास अधिक वाढल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संभाजीनगरच्या डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. त्यामुळे संभाजीनगरच्या डॉक्टरांचं पथक तात्काळ आंतरवालीत पोहचलं आणि जरांगे यांची तपासणी करण्यात आली. रात्री दहा वाजता पहिला इसीजी काढण्यात आला, ज्यात कोणताही धोका नसल्याचे समोर आले. त्यानंतर देखील डॉक्टरांचं पथक तिथेच थांबून होते. रात्री दीड वाजता पुन्हा दुसरा इसीजी काढण्यात आला आणि त्यात देखील कोणताही धोका नसल्याचे समोर आले.