पुढील 48 तासांत पावसाची शक्यता!

राज्यासह देशात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आजही देशात काही भागात पावसाची शक्यता आहे. पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातही काही ठिकाणी आज पावसाची रिमझिम पाहायला मिळेल.

पुढील 48 तासात पावसाची शक्यता

देशाच्या विविध भागात पुढील 48 तासांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, मराठवाडासह विदर्भात पुन्हा पावसाचा हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. गारपिटीमुळे विदर्भात पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पुढील 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नाशिक,बुलढाणा जालना, हिंगोली भागात गेल्या दोन दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी आणि सोमवारी उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मध्य प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये पुढील 24 तासात गारपिट होण्याचा अंदाज वर्तवला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.