आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना पाठवण्यात आली कारणे दाखवा नोटीस..

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका रणजीतसिंह पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आमदार रणजितसिंह पाटील यांना नाटीस पाठवली आहे. तसेच या नोटीसवर सात दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश देखील रणजीतसिंह पाटील यांना देण्यात आले आहे. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटील यावर काय निर्णय घेणार, कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करतं पक्षाचे आभार मानले आहेत.रणजीतसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा द्यायला हवा. खरंच त्यांना लाज वाटत असेल ना…आपण ज्या देवाभाऊंच्यामुळे माणसात आहोत, जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला, असं म्हणत रणजीतसिंह पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यामुळे गोपीचंद पडळकरांच्या या मागणीला यश आल्याचं बोललं जात आहे.