अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीत खूपच वाढ झालेली आहे. अवैध धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. याला पायबंद घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालेले आहे. इचलकरंजी शहरात देखील अवैध धंदे जोरात सुरु आहेत.
येथील जुना चंदूर रोडवर शेतात उघड्यावर सुरू असणाऱ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून चार मोटारसायकली, रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य, असा एकूण दोन लाख ५४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सतगोंडा पाटील (वय ७२), सिद्राम हुल्ले (६१), राजाराम वसवाडे (५५), बमलिंगअप्पा हिप्परगी (५२), संजय जाधव (४५), श्रीधर तेरणे (३९), शौकत मंगसुळे (५०), राजेंद्र घोटणे (५०, सर्व रा. पाटील गल्ली, गुरुकन्ननगर इचलकरंजी), पोपट भगवान देवकाते (७६, रा. चिंचणे गल्ली, लिंबू चौक), गुरुनाथ अंकद (५३, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी), तानाजी भोसले (३९, रा. दुर्गामाता चौक, जुना चंदूर रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सतगोंडा पाटील याच्या मालकीच्या शेतजमिनीत दोन ठिकाणी संशयित तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सुकुमार बरगाले यांनी दिली.